तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
कोल्हापूर दि.१/८/२०२३
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेकडून अभियान तरुण मंडळाचे सांस्कृतिक केंद्रात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,
यावेळी तथागत ग्रुप चे जिल्हाध्यक्ष अरुन कदम व श्रम फौंडेशनचे अध्यक्ष कमलाकर सारंग यांनी साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,व अण्णाभाऊ साठे यांचे विचार व माहिती तरुणांच्या मनात रुजविण्या विषयी माहिती दिली यावेळी संतोष बीसुरे, वसंत लिगणुकर यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जिवन गौरवपर आदी मान्यवरांनी भाषणे केली.
पुढील क्रार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार संतोष जोंगदड यांनी मानले.
