तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना जिल्हा बुलढाणा येथील देऊळगावराजा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेधार्थ निवेदन.
देऊळगावराजा प्रतिनिधी - दि. 01-08-23
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना जिल्हा बुलढाणा येथील देऊळगाव राजा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेधार्थ निवेदन मणिपूर राज्यात काढलेली महिलांची नग्न धिंड आणि बेडगाव येथे समाजकंटकांनी उध्वस्त केलेली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची कमान या अमानवी घटनेच्या निषेधाबाबत तथागत ग्रुप बुलढाणा जिल्हा देऊळगाव राजा तालुक्याच्या वतीने तहसिल येथे तहसीलदार मॅम यांना निवेदन देण्यात आले.
हे निवेदन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र प्रदेश सचिव राधेशाम खरात, महिला आघाडी,महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख जाकेरा बी शेख,रेखा शिंगणे आदी समस्त पदाधिकारी कार्यकर्ते व महीला आघाडी उपस्थित होते.
