तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Sunday, 13 August 2023

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन.


 तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन..

मेहकर प्रतिनिधी - 13-08-23

मेहकर :- तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक संदिपभाऊ गवई यांनी पुष्प हार अर्पण करुन  अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थापक संदिपभाऊ गवई आपल्या छोट्या खानी भाषणात सांगितले, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी!! अहिल्यादेवी यांनी अनेक घाट,शिवमंदिरे,धर्मशाळा बांधल्या.अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला. पति निधनानंतर त्यांना सासरे मल्हारराव होळकर यांनी राज्य चालविण्याचे मार्गदर्शन केले.पंरतु दुर्दैवाने मल्हारराव यांचे अकाली निधन झाले. राज्याची सर्व जबाबदारी अहिल्यादेवी यांच्यावर आली. न डगमगता त्यांनी अतिशय संयमी व धीराने राज्याची धुरा सांभाळली. एकिकडे इंग्रज तर एकिकडून आपलेच म्हणवणारे पेशवे त्यांच्या राज्यावर चाल करुन येत.अहिल्यादेवींनी धीरोदात्तपणे त्यांना तोंड दिले.

अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन..!!


यावेळी, तथागत ग्रुप संस्थापक संदिपभाऊ गवई,राधेशाम खरात,अनिल देबाजे,राजकुमार ऊचित,कुणाल माने आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेतील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते..