असंघटित कामगारांनी संघटित होऊन आपले हक्क मिळवावे..अतिशभाई खराटे
वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने खामगांव येथे कामगार मेळावा उत्साहात
खामगाव -
वंचित बहुजन युवक आघाडी खामगाव तालुक्याच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बांधकाम कामगार व असंघटित मजूर मेळावा तथा मोफत नोंदणीचे आयोजन स्थानिक पत्रकार भवन येथे युवक तालुकाध्यक्ष अमोल शेगोकार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले
या मेळाव्याचे उद्घघाटन वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे हे होते, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे,विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष शरदभाऊ वसतकार,महिला जिल्हाध्यक्षा विशाखाताई सावंग,कृ.ऊ.समितीचे उपसभापती संघपाल जाधव,तालुकाध्यक्ष प्रभाकर वरखडे,युवा तालुकाध्यक्ष अमोल शेगोकार,पत्रकार मनोज बागडे, शहरातील युवा नेतृत्व विष्णू गवई,हर्षवर्धन खंडारे,ऍड.अभिजीत वानखडे उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली सदर शिबिरामध्ये शहरासह तालुक्यातील शेकडो महिला व पुरुष कामगारानी सहभाग नोंदवत आपली नोंदणी करून घेतली
यावेळी अतिशभाई खराटे यांनी कामगारांच्या समस्या बाबत सरकारची उदासिनता असल्या मुळे असंख्य मजुरांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत इथले सत्ताधारी पक्ष कामगारांना न्याय न देता भांडवलदारांचे हित जोपासण्यात धन्यता मानतात त्यामुळे माञ वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पक्ष कामगाराच्या हितासाठी सदेव लढा देत आहे व वंचितांचे हित जोपासणारे कार्यक्रम राबवत असतो त्याचा एक भाग म्हणून आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत व्यक्त केले. तसेच विशाखाताई सावंग यांनी या नोंदणीतून मिळणाऱ्या योजना समजावून सांगत मार्गदर्शन केले
कार्यक्रम यशस्वीयतेसाठी सुमेध सावंत,निखिल सावंग,हर्षवर्धन वानखडे,मानस गवळी,रत्नाकर सावदेकर,अक्षय हिवराळे,शेख अझहर,स्मिता ताई इंगळे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गिरीष उमाळे यांनी केले
