वृद्धाची निःस्वार्थ सेवा करायला भाग्य लागते
दिपक वाघ
तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात किराणा देऊन वाढदिवस साजरा.
चिखली -: ऋणानुबंध समाज विकास संस्था द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे निराधार बेघर उपेक्षित दुर्लक्षित घरातून काढून दिलेले वयोवृद्ध आई वडील आजी आजोबा राहतात त्याना राहण्याची सुविधा जेवण वैद्यकीय सेवा कपडे औषधी सह इतर सर्व सेवा निःस्वार्थपणे अगदी मोफत सुरु आहे. वृद्धाश्रमा च्या वतीने सामाजिक माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र कोळी समाज संघ चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष दिपक वाघ यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त वृद्धाश्रमास पंधरा दिवस पुरेल एव्हडा किराणा भेट दिला . यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष भोकर चे सरपंच गजानन फोलाने, प्रमुख मार्गदर्शक विजू महाराज तर प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते अमर भाकरे, स्वप्नील जाधव हे होते.
वृद्धाश्रमातील वृद्धाची सेवा बघून दिपक वाघ भारावून गेले वृद्धाची निःस्वार्थ सेवा करायला खरोखर खूप भाग्य लागते ते तुम्हाला मिळाले खूप नशीब वान आहात अशी प्रशवंसं करून शाबासकी दिली. वृद्धाश्रमाचे संचालक व संचालिका यांना त्यांनी केले. माझ्या वाढदिवसाच्या निमित्त मी आज छोटी शी भेट दिली परंतु भविष्यात आश्रमास कोणतीही अडिअडचण आल्यास सदैव तत्पर राहील असे आश्वासन सुद्धा यावेळी त्यानी दिले.
कार्यक्रम चे सूत्रसंचालन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी तर आभार रुपाली डोंगरदिवे यांनी केले. यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धासह गावातील प्रतिष्ठित उपस्थित होते.

