वृद्धाच्या सेवेत परमेश्वराचे खरे दर्शन घडते
डॉ पंढरी इंगळे
भोकर ग्रामपंचायत च्या वतीने फळ फराळ वाटप.
चिखली -:- तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे हे निराधार बेघर अशा वयोवृद्ध लोकांना मोफत सेवा देत असल्यामुळे खऱ्या परमेश्वराचे दर्शन दररोज घेतात व आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आम्हाला हि घडवतात त्यांचे कार्य खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृद्धाश्रमातील वृद्धासह गावातील गरजू लोकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करून आम्हाला सेवेची संधी दिली असे विचार गंगाई हॉस्पिटल चे डॉ पंढरी इंगळे यांनी व्यक्त केले. १८ ऑगष्ट रोजी आयोजित आरोग्य शिबरीराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भोकर ग्रामपंचायत च्या वतीने वृद्धाश्रमासह शिबिरातील नागरिकांना फळ फराळाचे वाटप करण्यात येऊन वृद्धाश्रमासाठी लागेल ती मदत करण्याचे संतोष काळे यांनी आश्वासन दिले. यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष भोकर चे प्रतिष्ठित तथा ग्रामपंचायत चे मार्गदर्शक संतोष काळे, प्रमुख मार्गदर्शक गंगाई हॉस्पिटल चे डॉ पंढरी इंगळे तर विशेष उपस्थितीत सरपंच गजानन फोलाने, उपसरपंच अनंता डोंगरदिवे, रमेश डोंगरदिवे, गणेश डोंगरदिवे हे होते.
दिनांक १८ ऑगष्ट २०२३ रोजी ऋणानुबंध समाज विकास संस्थे द्वारा संचलित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम चे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृद्धाश्रमात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गंगाई हॉस्पिटल च्या वतीने वृद्धाश्रमातील वृद्धासह शेकडो गरजु रुग्णाची भर पावसात तपासणी करून औषधं उपचार मोफत देण्यात आला. या शिबिराचा शेकडो गरजुनी लाभ घेतला तर अनेक मान्यवरानी प्रत्यक्ष भेटी देऊन शुभेच्छा चा वर्षाव केला. यावेळी सौं जया अजय जेदे, सिद्धार्थ जेदे, महेक जेदे, अभिजित गिरी, विजय सुरुशे, प्रियांका वानखडे, संगीता वानखडे, द्वारका घेवंदे, धम्मपाल घेवंदे, रवींद्र घेवंदे, गंगाई हॉस्पिटल चे कर्मचारी यांच्यासह इतर उपस्थित होते.

