वडीलांचा वाढदिवस वृद्धाश्रमात सेवा देऊन साजरा.
चिखली प्रतिनिधि -: दि. 06/08/23
प्रहार संघटनेचे शहरअध्यक्ष धनंजय जटाळे यांनी आपले वडील विजय आप्पा जटाळे यांच्या वाढदिवसानिमित्त तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे किराणा वस्तू भेट दिली.
ऋणानुबंध समाज विकास संस्था द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे निराधार बेघर उपेक्षित घरातून काढून दिलेले वयोवृद्ध आई वडील आजी आजोबा राहतात त्याना मोफत जेवण वैद्यकीय सेवा कपडे औषधी सह इतर सर्व मोफत सेवा सुरु आहे. यां वृद्धाश्रमा च्या वतीने सामाजिक माध्यमातून मदतीचे आव्हाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद म्हणून प्रहार संघटनेचे चिखली शहर अध्यक्ष धनंजय जटाळे यांनी आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृद्धाश्रमास एक आठवडा पुरेल असे किराणा वस्तू भेट दिल्या. यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष भोकर चे सरपंच गजानन फोलाने, प्रमुख मार्गदर्शक चिखली पत्रकार संघांचे अध्यक्ष योगेश शर्मा, भाजपा चे दलित आघाडी चे जिल्हा अध्यक्ष एड दिलीप यंगड, पोलीस कर्मचारी श्रीराम निळे, तर प्रमुख उपस्थित गोदरीचे सरपंच भरत जोगदंडे, गिरीष दहिवाळ व राजाधिराज छञपती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष शंकरभाऊ देशमाने, प्रशांत जैवाळ, प्रवीण डोंगरदिवे हे होते. कार्यक्रम चे सूत्रसंचालन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी तर आभार रुपाली डोंगरदिवे यांनी केले. यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धासह गावातील प्रतिष्ठित उपस्थित होते.
