महाराष्ट्र मध्ये सदैव जनतेच्यासेवेसाठी अग्रेसर असणारी एकमेव संघटना तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जोपासली सामाजिक बांधिलकी.
चिखली प्रतिनिधि - 07/09/23
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने चिखली येथील ऋणानुबंध समाज विकास संस्था द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे बेघर निराधार वयोवृद्ध ना सर्व प्रकारची सेवा मोफत देण्यात येते या वृद्धाश्रमाच्या कार्याची दखल घेत सामाजिक क्षेत्रात नेहमी कार्यरत असलेल्या तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने वृध्दाची सेवा करन्यासाठी सर्व वयोवृद्ध यांना फळे व नाश्ता वाटप करण्यात आला, यावेळी मार्गदर्शक संस्थापक संदिपभाऊ गवई राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश कांबळे,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अंकुश भाऊ राठोड,महाराष्ट्र सचिव राधेशाम खरात, महिला आघाडी संपर्क प्रमुख जाकेरा बी शेख, बुलढाणा जिल्हा अध्यक्षा प्रतिभा गवई हे होते. नोदणी कृत संस्थेच्या माध्यमातून तुकाराम आश्रय वृद्धाश्रम मध्ये गेल्या वर्षभरापासून निःस्वार्थ भावनेतून बेघर निराधार वयोवृद्ध आजी आजोबांना स्वखर्चाने तर कधी लोक वर्गणी किंवा मोजक्याच दात्यांनी दिलेल्या दानावर प्रशांत डोंगरदिवे व त्यांच्या पत्नी रुपाली डोंगरदिवे हे मोफत सेवा देत आहे . या आश्रमाचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार होत असल्यामुळे येथे अनेक बेघर निराधार वृद्ध वृद्धाश्रमात येण्यास तयार आहेत परंतु काही अडचणीचा सामना करावा लागत असल्याने दात्यानी पुढे होऊन वृद्धाश्रमास सढळ हाताने मदतीला यावे असे विचार कार्यक्रम चे अध्यक्षा महिला आघाडी संपर्क प्रमुख जाकेरा बी शेख यांनी व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव राधेशाम खरात,महाराष्ट्र संघटक कुणाल माने,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सचिन गवई, महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख जाकिराबी शेख,बुलढाणा जिल्हा अध्यक्षा प्रतीभा गवई, आदी तथगत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

