वृद्धाच्या सेवेत सदैव हजर राहू
दिपक खरात
महात्मा फुले गणेश मंडळाचा उपक्रम
चिखली प्रतिनिधि - दि.07/09/23
गोकुळ अष्टमी निमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात आलू कांदे लसन आटा व अल्प किराणा भेट देऊन वृद्धाश्रमातील वृद्धाना आधार देण्याचं भाग्य लाभले परंतु भविष्यात वृद्धाश्रमातील वृद्धाच्या सेवेत सदैव हजर राहू असे प्रतिपादन माजी नगरसेवक दिपक खरात यांनी व्यक्त केले.
तुकाराम आश्रय वृद्धाश्रम च्या मदतीचे आव्हान करण्यात आले होते त्याला प्रतिसाद देत दिपक खरात यांनी वृद्धाश्रमा चे संचालक यांना संपर्क करून विचारणा केली असता आलू कांदे लसन चि कमतरता असल्यामुळे क्षणाचाही विलंब न करता श्रीकृष्ण जयंती निमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात आलू कांदे लसन व अल्प किराणा वाटप करून वृद्धाश्रमातील वृद्धाना आधार देण्यासाठी माजी नगरसेवक दिपक खरात व महात्मा फुले गणेश मंडळाच्या वतीने विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचे वृद्धाश्रमाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या वेळी वृद्धाश्रमा चे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी संचलन तर रुपाली डोंगरदिवे यांनी आभार व्यक्त केले यावेळी दिपक खरात मित्र मंडळाच्या वतीने नगर सेवक दिपक खरात ,दिपक मगर आकाश गाडेकर कार्तीक जाधव गोपाल खरात योगेश तुळशे गोटु खरात अभीशेख भराड आदित्य भराड सोहम भराड अविनाश खरात शेख आसीफ मोसीन भाई
दिपक खरात मित्र मंडळ व महात्मा फुले गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
