परिवहन महामंडळाने एसटीचे स्टेअरिंग महिलांच्या हाती देण्यास सुरूवात केली आहे. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Saturday, 9 September 2023

परिवहन महामंडळाने एसटीचे स्टेअरिंग महिलांच्या हाती देण्यास सुरूवात केली आहे.



 

परिवहन महामंडळाने एसटीचे 

स्टेअरिंग महिलांच्या हाती देण्यास सुरूवात केली आहे.

खामगाव प्रतिनिधि -

चालकपदासोबतच यांत्रिकक्षेत्रातही महिलांना संधी देण्यात येत आहे.


 जिल्ह्यात पहिल्यांदाच काही आगारात महिला चालक रूजू झाल्या आहेत. यामध्ये खामगाव आगारातही पहिल्यादांच महिला चालक रूजू झाल्या आहेत.


बुलडाणा जिल्ह्यात सात आगार असून पहिल्या टप्प्यात मेहकर, मलकापूर आणि खामगाव आगरात तीन चालक रुजू झाल्या आहेत. मेहकर आगारात संगीता लादे यांनी खामगाव ते मेहकर बसफेरी चालवून आपल्या सेवेचा शुभारंभ केला. त्याचवेळी खामगाव आगारात रूजू झालेल्या सौ. स्नेहा शिवाजी खुळे यांनी खामगाव ते शेगावपर्यंत बस चालवून पहिल्याच फेरीचा शुभारंभ केला. यावेळी आगार व्यवस्थापक संदीप पवार, वाहतूक निरिक्षक मोहिनी पाटील, सहा. वाहतूक निरिक्षक सरला तिजारे, गजानन खेडकर, शिवाजी आनंदे, माणिक गोरे, सपकाळ आदी उपस्थित होते.  बुलढाणा जिल्ह्यातील विविध आगारात रूजू झालेल्या महिला चालकांना महामंडळाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.