तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने 67 धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा..
मानखुर्द प्रतिनिधि - मुंबई
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य महीला आघाडीच्या तसेच रमाई महिला बचत गट यांच्या वतिने मुंबई मानखुर्द येथे सम्राट अशोका विजयादशमी तसेच 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध तसेच सम्राट अशोक व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन मोठ्या उत्सहात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला यावेळी तथागत ग्रुपच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष मिराताई कांबळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिंधुताई एटम, यांनी व समस्त महिला पदाधिकारी यांनी अभिवादन केले..
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदिपभाऊ गवई, तथागत ग्रुपच्या प्रदेश कार्याध्यक्ष सौ.मिराताई कांबळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिंधुताई एटम, मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष श्वेता भालेराव, मुंबई प्रदेश युवती अध्यक्ष संघमित्रा एटम, प्रमिला कांबळे, मनीषा घोलप, आशा शिंदे, हिरकल सुरते, कवा बाई सिरसाठ, द्वारकाबाई सुरते, राघू कांबळे, संदीप सुरते, कार्तिक सुरते तसेच तथागत ग्रुपचे समस्त महिला आघाडी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
