मेहकर एम आय डी सी मधील भुखंड हडप करणार्या वर कार्यवाही करण्यात यावी आशी मागणी- तथागत ग्रुप संस्थापक अध्यक्ष संदिप गवई - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Friday, 3 November 2023

मेहकर एम आय डी सी मधील भुखंड हडप करणार्या वर कार्यवाही करण्यात यावी आशी मागणी- तथागत ग्रुप संस्थापक अध्यक्ष संदिप गवई

आज कि बात न्यूज


 मेहकर एम आय डी सी मधील भुखंड हडप करणार्या वर कार्यवाही करण्यात यावी आशी मागणी- तथागत ग्रुप संस्थापक अध्यक्ष संदिप गवई 


मेहकर : मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या मार्गदर्शनाखाली मा. प्रदिप पाटिल साहेब उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्या मार्फत बुलढाणा, मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मा.जिल्हाधिकारी साहेब, मा.आयुक्त साहेब अमरावती यांना निवेदन सादर करण्यात आले कि मेहकर शहरातील एम आय डीसी मध्ये जे काही अतीक्रमण आहे ते काढण्यात यावे. या एम आय डीसी मध्ये बोगस नोंदणी करुन भुखंड त्यांच्या नावांवर केले आहे त्या लोकांनवर तात्काळ कारव्हाई करण्यात यावी. तसेच बोगस कंपन्या नोंदवुन उद्योजकांनच्या नावाखाली ज्यांनी भुंखंड हाडपले आहेत त्यांची व त्यांना भुखंड देणार्या अधिकारी यांची खाते निहाय चौकशी करण्यात यावी जर या प्रकरणी कारवाई न झाल्यास तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल आशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली.


यावेळी,तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई,गौतम नरवाडे, कुणाल माने,राधेशाम खरात,संतोष अवसरमोल,सचिन गवई, दुर्गादास अंभोरे, सिताराम गवई, महादेव मोरे,समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते..