आरोग्यमंत्री राजीनामा द्या; तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना आक्रमक..! - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Monday, 16 October 2023

आरोग्यमंत्री राजीनामा द्या; तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना आक्रमक..!


 आरोग्यमंत्री राजीनामा द्या; 

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना आक्रमक..!


मेहकर प्रतिनिधि  :- दि.16/10/23

 शासनाच्या धोरणांचा धिक्कार राज्य शासनाच्या जनविरोधी निर्णय व धोरणांच्या विरोधात तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मेहकर तहसील कार्यालय येथे निषेध करण्यात आला. शासकीय रुग्णालयांतील मृत्यूप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक संदिप गवई यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले,व संघटनेच्या वतीने' शासनाचा निषेध असो, निषेध असो' यावेळी बोलतांना तथागत ग्रुपचे संस्थापक संदिप गवई यांनी सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला. कंत्राटी पद्धतीने नोकरभरती, दत्तक शाळा योजना, रुग्णालय खाजगी कंपनीना चालविण्यासाठी देणे हे अलीकडे घेतलेले निर्णय सर्वसामान्य, गोरगरीब विद्यार्थी, बेरोजगार मागासवर्गीय यांच्या मुळावर उठणारे आहेत, असे संदिप गवई म्हणाले. युवक, शेतकरी, आर्थिक दुर्बल घटकाला भेडसावणाऱ्या विषयांवर शासन अतिशय उदासिन आहे. कंत्राटी भरतीसारखे तुघलकी निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस-पवार यांचे तिघाडी सरकार आधीच बेरोजगारीच्या समस्येने ग्रासलेल्या युवकांना वेठिस धरण्याचे काम करत आहे. यामुळे करोडो राज्यवासियांचे भवितव्य उध्वस्त होणार आहे. नांदेड, समाजी नगर, ठाणे, नागपूर येथील शासकीय रुग्णालयांतील गोरगरीब रुग्णांच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्य मंत्री यांनी आता तरी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संदिप गवई यांनी केली. यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला पटसंख्ये अभावी शाळा बंद करू नये, शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा भरपाई व आर्थिक मदत देण्यात यावी, याकरिता वरील मागण्यांसाठी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेकडुन निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.


यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक संदिप गवई, गौतम नरवाडे,राधेशाम खरात कुणाल माने,अंकुश राठोड,गजानन सरकटे,देवानंद अवसरमोल,दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे,जफरभाई शहा,सचिन गवई,सुधाकर वानखेडे,नितीन बोरकर,विजय सरकटे,युनुस शहा,योगेश अवसरमोल,सुनील खंडारे,तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे समस्त पदाधिकारी व सदस्य तसेच आदी मान्यवर सहभागी होते.