तथागत ग्रुपच्या वतीने दिलीप जाधव पाटील यांनी बौध्द समाजाबद्दल गलिच्छ वक्तव्य केल्याबद्दल उप विभागीय पोलीस अधिकारी यांना दिले निवेदन.
मेहकर प्रतिनिधि :- दि.16/10/23
मेहकर येथे तथागत ग्रुपचे संस्थापक संदिप गवई यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी यांना दिले निवेदन दि. १३/१०/२०२३ रोजी दिलीप जाधव पाटील चेरेकर यांनी सोशल मिडीया इंस्टाग्रामच्या माध्यमातुन दोन समाजात तेड निर्माण करणारे वक्तव्य केले व सदर वक्तीने इंस्टाग्राम आयडी नंबर dilipjadhavpatil या आयडीवरुन व्हिडीओ बनवुन सोशल मिडीयावरुन प्ररसारीत केले व त्या व्हिडीओ क्लिप मध्ये महारांनो तुमच्या बायका आमच्या सारख्यांना बोलावुन घरामध्ये बसतात. तो खेळ बघुन तुम्ही गरिबावर ॲस्टॉसिटी दाखल करायची सवल झाली आहे. माझाकडे या तुमच्या मायला घोडा लावतो. खुपसुन टाकतो, महारांनो, धेंडग्यांनो असे गल्लीच्छ वक्तव्य करुन दोन समाजात तेड निर्माण करणारे वक्तव्य केले व पोलीसांना जाऊन विचारा मी कोण आहे. तरी मेहरआन साहेबांनी सादर व्यक्तीवर अनुसुचित जाती जमाती कायदे अंतर्गत कायदेशिर करवाई करुन गुन्हा दाखल करण्यात यावा आशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल यांची नोंद घेण्यात यावी व याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील.
यावेळी, तथागत ग्रुपचे संस्थापक संदिप गवई, गौतम नरवाडे, राधेश्याम खरात, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे,देवानंद अवसरमोल,जफर शहा, कुणाल माने,विजय सरकटे आदी तथागत ग्रुप चे समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
