जागतिक वृद्ध दिवस व गांधी जी जयंती वृद्धाश्रमात साजरी*
*मान्यवरांच्या हस्ते वृद्धाचा सत्कार व फळ फराळ वाटप.
चिखली प्रतिनिधी -: जागतिक वृद्ध दिवस व राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त ऋणानुबंध समाज विकास संस्था द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम चे अध्यक्ष भोकरचे सरपंच गजानन फोलाने तर प्रमुख मार्गदर्शक जेष्ठ समाज सेवक सुनील लाहोटी, रामदेव गॅस एजन्सीज चे शैलेश बाहेती तर विशेष उपस्थिती मध्ये हेमंत कुचरिया, प्रतिष्ठित व्यापारी संतोष काळे पाटील, उपसरपंच अनंता डोंगरदिवे, मनोहर डोंगरदिवे, सुभाष नेवरे हे होते.
तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाच्या माध्यमातून निराधार बेघर वयोवृद्धाची सेवा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रशांत डोंगरदिवे करीत आहे. आज हा प्रकल्प लहान दिसत असला तरी भविष्यात विशाल स्वरूपात होणार आहे. आज भोकर गावातून यांना सहकार्य मिळत आहे. भविष्यात चिखली व इतर ठिकाणावरून दानशूर व्यक्ती या वृद्धाश्रमातील वृद्धाना मदत करतील तरच निराधार बेघर लोकांना खरा आधार मिळेल असा आत्मविश्वास यावेळी मार्गदर्शक म्हणून जेष्ठ समाज सेवक सुनील लाहोटी यांनी व्यक्त केले. तर घरामध्ये वृद्ध असेल तरच आपले जीवन सफल आहे कारण त्याच्या मागे फार मोठा अनुभव असतो त्यांचा अनुभव व आशीर्वाद पाठीशी असेल तरच आपले भविष्य उज्वल आहे.असे मत रामदेव गॅस एजन्सी चे संचालक शैलेश बाहेती यांनी व्यक्त केले. तर खरच सामाजिक कार्याची आवड असणारांनी समाजामध्ये अनेक निराधार बेघर वयोवृद्ध आहेत अशांना वृद्धाश्रमात दाखल करून त्यांना चांगले जीवन आरोग्य देण्यासाठी समाज सेवक व नागरिकांनी समोर आले पाहिजे तसेच वृद्धाश्रमास वेळोवेळी लागेल ती मदत भोकरवासी या नात्याने मी सदैव करील असे विचार प्रतिष्ठित व्यापारी संतोष काळे पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृद्धाश्रमातील वृद्धाचा सत्कार करून त्यांना फळ फराळ वाटप करण्यात आले.कार्यक्रम चे संचालन प्रशांत डोंगरदिवे यांनी तर आभार प्रदर्शन रुपाली डोंगरदिवे यांनी केले. यावेळी कावेरी डोंगरदिवे, संगीता वानखडे, प्रियांका वानखेडे, वनिता डोंगरदिवे, द्वारका घेवंदे, धम्मपाल घेवंदे यांच्यासह गावातील इतर नागरिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
