*उद्या बुलढाणा शहरात आम आदमी पक्षाची जाहीर सभा*
बुलढाणा प्रतिनिधि - दि.03/10/23
बुलढाणा जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व सदस्य, सर्व हितचिंतक आणि सर्व देशप्रेमी नागरिक यांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, 2 ऑक्टोंबर 2023 रोजी सेवाग्राम इथून निघालेली आम आदमी पार्टीची विदर्भ झाडू यात्रा बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी दुपारी बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर येथे येणार असून त्यानंतर चिखली वरून बुलढाणा येथे येणार आहे. दुपारी चार वाजता बुलढाणा शहरात पैदल रॅलीचे आयोजन केले असून संध्याकाळी सहा वाजता गांधी भवन जयस्तंभ चौक या ठिकाणी एका विशाल जनसभेचे आयोजन केलेले आहे. या सभेमध्ये आम आदमी पार्टी महाराष्ट्र चे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार असून आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या सभेमध्ये उपस्थित राहून परिवर्तनाच्या या लढाईत सहभागी व्हावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी 5 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता बुलढाणा शहरातून निघून मोताळा मार्गे मलकापूर शहर त्यानंतर नांदुरा, खामगाव व शेगाव या शहरातून जाणार असून पुढे अकोल्याकडे रवाना होणार आहे तरी आपण सर्वांनी या झाडू यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेऊन महाराष्ट्रातील राजकारण स्वच्छ करण्यासाठी व सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपला वेळ द्यावा ही विनंती.
डॉक्टर नितीन नांदुरकर जिल्हाध्यक्ष बुलढाणा.
