*कोणत्याही परिस्थितीत जि. प. शाळा बंद पडू देणार नाही*
ज्योती खेडेकर
चिखली -: तालुक्यातील भोकरवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद पडू नये या विषयावर चर्चासत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
तसेच महाराष्ट्र शासनाने घेतलेला चुकीच्या निर्णया नुसार बुलढाणा जिल्ह्यातील 170 जिल्हा परिषद शाळा व चिखली तालुक्यातील पंचवीस शाळा व केळवद जिल्हा परिषद सर्कल मधील एकमेव शाळा म्हणजे भोकरवाडी येथील शाळेचा समावेश असल्याने सरकार च्या चुकीच्या धोरणा संदर्भात चर्चा सत्र घेण्यात आले. यावेळी कार्यक्रम चे मुख्य मार्गदर्शक माजी जिल्हा परिषदेच्या लोकप्रिय सदस्य सौ ज्योतीताई खेडेकर, कार्यक्रम चे अध्यक्ष भोकर सरपंच गजानन फोलाने तर विशेष उपस्थिती मध्ये ग्रामपंचायत चे मार्गदर्शक तसेच बालाजी ग्रुपचे प्रसिद्धी प्रमुख संतोष भाऊ काळे पाटील, उपसरपंच अनंता डोंगरदिवे, सदस्य संदीप डोंगरदिवे, शरद डोंगरदिवे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम चे संचालक प्रशांत डोंगरदिवे हे होते.
कोणत्याही परिस्थिती मध्ये जि. प. शाळा बंद पडू देणार नाही कारण याच शाळेतून आजचे अनेक अधिकारी बनले आहे तसेच आज ह्या शाळा बंद पडल्या तर गोर गरीब विध्यार्थी यांचे अतोनात नुसकान होईल ते शिक्षणापासून वंचित राहतील म्हणून ह्या शाळा वाचविणे आपली सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे जर तुम्ही सर्व साथ देसाल तर शाळा कधी हि बंद पडू देणार नाही. यावेळी शाळेच्या विद्यार्थी यांची संत कृपा हॉस्पिटल मध्ये मोफत तपासणी व ओषधो उपचार केल्या जाईल असे आश्वासन दिले.
गावातील जिल्हा परिषद शाळा आम्ही कोणत्याही प्रसंगी बंद पडू देणार नाही त्याच्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही. असे गावकऱ्यांनी सांगितले व ग्रामपंचायत कडून वेळोवेळी जे जे सहकार्य लागेल ते आम्ही करण्यास तयार आहे असे संतोष काळे पाटील यांनी ताईना शब्द दिले यावेळी जि. प. शाळेचे मुखध्यापक व शिक्षक, विध्यार्थी व पालक वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.
