*साई संप्रता फार्माटेक प्रोड्युसर कंपनी भोकरवाडी सात गावातील पंचकोर्षितील सरपंच यांनी केले उदघाट्न* - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Wednesday, 15 November 2023

*साई संप्रता फार्माटेक प्रोड्युसर कंपनी भोकरवाडी सात गावातील पंचकोर्षितील सरपंच यांनी केले उदघाट्न*


 *साई संप्रता फार्माटेक प्रोड्युसर कंपनी  भोकरवाडी सात गावातील पंचकोर्षितील सरपंच यांनी केले उदघाट्न*

चिखली :- दिपावलीच्या निमित्त भोकर चिखली पासून जाफ्राबाद रोडवर 7 किलोमीटरच्या अंतरावर भोकरवाडी स्टॉप येथे साई संप्रता फार्माटेक प्रोड्युसर कंपनी च्या वतीने शेअर हाऊस शुभारंभ व शेतकऱ्यांचे माल ठेवण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे तसेच अल्पभूधारक शेतकरी व कंपनीचे शेअर होल्डर्स यांच्यासाठी सवलत दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि येणाऱ्या काळात शासनाने जर कंपनीला को स्टोरेज वेअर हाऊस बांधण्यासाठी  सबसिडी उपलब्ध करून दिल्यास कंपणीच्या वतीने पंचक्रोशीतील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी काही सवलती मध्ये सेवा देण्यास कंपनी कटिबंध राहील. सर्वांच्यातसेच साई संप्रता फार्माटेक प्रोड्युसर कंपनी चे संस्थापक अध्यक्ष कालकथित दगडू पा. काळे पाटील यांचे संकल्पनेतून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आपला मालसाठविण्यासाठी तसेच मागासवर्गीय अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी कंपनीच्या भागधारक सभासदांसाठी निःशुल्क राहील असे कंपनी च्या वतीने सांगण्यात आले आहे. 

साई संप्रता फार्माटेक प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून भोकरवाडी येथे वेअर हाऊस चे उद्घाटन भोकर पंचक्रोशीतील भुमीपूत्र खोर सरपंच हाके पाटील, सरपंच भोकर सौं लता गजानन फोलाने, पळसखेड सरपंच नीरज गायकवाड, गोदरी चे सरपंच अशोक सुरडकर, चांधई चे सरपंच, सांजुळ गणेश गायकवाड चे सरपंच भानखेडचे राजेश गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी जी प सदस्य ज्योती ताई खेडेकर, युवा सेना जिल्हा अध्यक्ष नंदू कऱ्हाडे, सुधाकर जाधव (माळी मामा ), बालाजी ग्रुप चे अभय जैन, मनीष अग्रवाल, गोदरी चे उपसरपंच भरत जोगदंडे,  हे होते.

यावेळी किसना फोलाने, प्रकाश शेळके, दुरोधन इंगळे, उपसरपंच अनंता डोंगरदिवे, ध्यनेश्वर नेवरे यांच्यासह व सर्व गावकरी संतोष काळे यांचे सहकारी मित्रमंडळी हे उपस्थित होते यावेळी कार्यक्रम चे संचालन तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात चे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन साई संप्रता फार्माटेक प्रोड्युसर कंपनी चे संचालक संतोष काळे यांनी केले.