पीक नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची मागणी- तथागत ग्रुप म.रा.संघटनेची - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Thursday, 30 November 2023

पीक नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची मागणी- तथागत ग्रुप म.रा.संघटनेची


 पीक नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची मागणी- तथागत ग्रुप म.रा.संघटनेची


बुलढाणा -  अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांचा चुराडा केला आहे आस्मानी संकटातून सावरण्यासाठी बळीराजाला आर्थिक मदतीचा मोठा हात हवा आहे. त्यासाठी पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आपध्दग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या नेतृत्वात मेहकर तहसिलदार साहेब यांच्या मार्फत

मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्ह्यासह राज्यभरात अवकाळी पाऊस पडला. सोबतच वादळ आणि गारपीटही झाली. तूर,हरभरा, मका,मका, कापूस,भाजीपाला, कांदा, गहू तसेच फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतीला पूरक असलेल्या व्यवसायालादेखील मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. पोल्ट्री फार्म, गोट फार्म तसेच मेंढ्या,बैल, गायी तसेच अन्य पाळीव प्राणीदेखील वादळ,पाऊस आणि गारपिटीच्या मायने मृत्युमुखी पडले आहे.

यामुळे जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर व शेतीपूरक व्यवसाय करणारा लघू व्यवसायायिक अडचणीत सापडला आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी तसेच शेतमजुरांनादेखील हाताला काम नसल्याने त्यांना किमान मानधन जाहीर करावे, अशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांनी केली आहे.