डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा : संदीप गवई - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Wednesday, 6 December 2023

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा : संदीप गवई


 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे

विचार आत्मसात करा : संदीप गवई


बुलढाणा प्रतिनिधी  - मेहकर दि.06 डिसेंबर

2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका मेहकर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार  महामानव भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तथागत ग्रुपच्या वतीने मेहकर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आपल्या छोट्याखानी भाषणातून सांगितले  बाबासाहेबानी जगण्याचा अधिकार दिला मानवाला देश विदेशात घेऊनी शिक्षण दिले प्रबोधनातून समाजाला ज्ञान दिला संदेश शिक्षणाचा महान सांगितला जपण्याचा सर्वांना अभिमान भेदभावाचे केले समूळ निर्मूलन जागविला प्रत्येकात प्रचंड स्वाभिमान शेतकऱ्यांच्या पाठी उभे राहतांना जगण्याच दिल बळ शोषितांना समाजासाठी केलं जीवाचं रान आत्मविश्वास गमावलेल्यांना दिलं जीवनदान बुरसटलेल्या रुढी परंपरांना नाकारलं अंधकारमय जीवांमध्ये प्रकाशाला आणलं लढले निर्भयतेने अन्याया विरोधात परिवर्तन आणिले घडवून समाजात स्वातंत्र्य समतेची दिली शिकवण हक्क सोपविले लिहून संविधान करूनी कष्ट झिजवून काया दिनदुबळ्यांना लावली प्रेमळ माया बाबासाहेब आंबेडकरांचे अतुल्य योगदान दिसते देशाच्या उत्कर्षात छान असे तथागत ग्रुप चे संस्थापक संदिप गवई यांनी सांगितले.


यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई, कुणाल माने, अख्तर कुरेशी, राधेशाम खरात, सचिन गवई, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे आदी तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.