*ॲड.देवकांत मेश्राम साहेब यांना पुरस्कार जाहीर*
बुलढाणा - मेहकर येथील तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने विधी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी *छत्रपती संभाजीनगर येथील ॲड.देवकांत मेश्राम साहेब यांना आदर्श विधिरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे*. येत्या 26 जानेवारी 2024 रोजी मेहकर येथे आयोजित कार्यक्रमात *ॲड.देवकांत मेश्राम साहेब यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना प्रणित तथागत बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत सामाजिक कार्य केले व त्यांच्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, महिला बचतगट, कंपन्या या ठिकाणी कायदेविषयक व्याख्याने दिली आहेत. तसेच त्यांनी कायदेविषयक सल्ला देऊन १०० हून अधिक जोडप्यांना घटस्फोट घेण्यापासून रोखण्यात यश मिळविले आहे.त्यांना मिळालेल्या पुरस्काराने छत्रपती संभाजीनगर परिसरातुन अनेक मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
