अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या; वंचित बहुजन महिला आघाडी आक्रमक
बुलढाणा - अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या या मागणीचे निवेदन वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना तहसीलदारामार्फत नांदुरा येथे निवेदन देण्यात आले.
बहुजन महिला आघाडी यांचेवतीने मौजा तरवाडी तालुका नांदुरा जि बुलडाणा येथील अडीच वर्षाच्या चिमुकलीवर नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी कडक शासन होवून पिडीत मुलीला न्याय मिळणेसाठी फौजदारी प्रकरण फास्ट ट्रक, जलद गती सत्र न्यायालयात चालविणे करीताचे निवेदन विशाखाताई सावंग वंचित बहुजन महिलाआघाडी जिल्हा अध्यक्षा बुलडाणा तसेच प्रितीताई शेगोकार नगरसेविका तथा जिल्हा उपाध्यक्षा, पार्वताबाई इंगळे, सुमनताई थाटे, जि उपा. अॅड रागिणी तायडे,, संगीता ससाने शेगाव शहर, अध्यक्षा, लक्ष्मीबाई मोरे जि सदस्या, अॅड सदानंद ब्राम्हणे जिल्हा उपाध्यक्ष, रेखाताई नितोने जिल्हा सदस्य, ता.अध्यक्षा मलकापूर संगीता सावळे, भगवान वाकोडे जि उपाध्यक्ष, श्रीकृष्ण इंगळे जि सचिव, गणेश वानखडे जि सहसचिव, सलीमभाई जि नेते, मंगला पारवे जळगांव, अॅड संजय इंगळे ता उपाध्यक्ष, अनिलभाऊ तायडे, त्रिभुवन शेळके, जयाताई वाघ ता अध्यक्ष नांदुरा,संगीता गवई, ताराबाई तायडे जिल्हा सदस्य, मायावती इंगळे, गजानन वाघ, जानराव हेलोडे अर्चना लुनेकर जिल्हा सचिव, राजेश वानखडे, कलाबाई वाघ ,संगीता हिवराळे ,निर्मला हिवराळे, सुमन हिवराळे, बेबीबाई हिवराळे ,कुसुम हिवराळे, सुनिता हिवराळे, निर्मला वानखडे, अजाबराव गाडे, यांचे निवेदनावर सह्या असुन निवदेन देतेवेळी सुरेश सुकदेव हिवराळे, दिलीपभाऊ वाकोडे, सुनिल खंडेराव, सुधाकर तायडे, गजानन वाकोडे माळेगांव भगवान तायडे प्रफुल्ल काशीराम हिवराळे याचे उपस्थित निवेदन देण्यात आले.
