वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन
मलकापुर
वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतीने तालुक्यातील ग्रामीण भागातील घरकुल मंजूर लाभार्थ्यांच्या वर्षानुवर्ष राहत असलेल्या जागेचे नियमाकुल करण्याचे प्रस्ताव त्वरित निकाली काढून त्यांच्या नावे नमुना "आठ अ" देण्यात यावा तथा अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येऊन तहसीलदारा मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी अतिशभाई खराटे बुलढाणा जिल्हा महासचिव, भाऊराव उमाळे संघटक, सुशीलभाऊ मोरे तालुकाध्यक्ष, जि.नेते बाळासाहेब दामोदर, महिला ता.नेत्या संगीता सावळे,अनिता सावळे,ता.उपाध्यक्ष यासीन कुरेशी, गजानन झनके, ता.सचिव गणेश सावळे, शांताराम सोनोने, यांच्यासह संतोष घोडके, प्रकाश सोनोने, किशोर मोरे, अतुल गवई, जफर खान, सतीश सावळे, नानाराव इंगळे, मनोज वानखेडे, हर्षवर्धन मोरे,गौतम सावळे, कैलास तायडे, अशोक शिरसाठ, शालिग्राम गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते
