तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेची मेहकर येथे आढावा बैठक संपन्न !
बुलढाणा- मेहकर येथील शासकिय विश्रामगृह येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असता या बैठकीला तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई,विदर्भ विभाग महासचिव अनिल धांडे, वाशिम जिल्हा अध्यक्ष गजानन खैरे मेहकर तालुकाध्यक्ष दुर्गादास अंभोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी संघटनेच्यावतीने मेहकर येथे समाज उपयोगी विविध उपक्रमाचे आयोजन सर्व धर्मिय विवाह सोहळा,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्याना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सोहळा,रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर, गरजु लोकांना बँल्केट वाटप,ग्रामीण रुग्णालयात फळवाटप, शासकिय योजना राबविणे असे विविध ठिकाणी समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार असुन याकरिता तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई तथागत ग्रुपचे विदर्भ विभाग महासचिव अनिल धांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बैठकीस सर्व युवकांनी व पदाधिकारी यांनी लावलेली हजेरी म्हणजेच तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या प्रती असलेले प्रेम दिसुन आल्याचे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच विदर्भ विभागातील विविध पदावरती अनिल कुमार धांडे विदर्भ विभाग महासचिव, वाशिम जिल्हा अध्यक्ष गजानन खैरे, वाशिम जिल्हा सचिव राहुल मोरे, वाशिम जिल्हा उपाध्यक्ष गजानन धांडे, वाशिम जिल्हा युवाध्यक्ष आदित्य काकडे, रिसोड तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण शटाणे, रिसोड शहर युवाध्यक्ष सुनील रांधळ, मेहकर तालुका अध्यक्ष गणेश वानखेडे यांच्या निवडी करण्यात आल्या आहे व सर्वाचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी, महाराष्ट्र राज्य संघटक मा.कुणाल माने,महाराष्ट्र प्रसिध्दी प्रमुख राधेशाम खरात,अनिल कुमार धांडे विदर्भ विभाग महासचिव, वाशिम जिल्हा अध्यक्ष गजानन खैरे, वाशिम जिल्हा सचिव राहुल मोरे, वाशिम जिल्हा उपाध्यक्ष गजानन धांडे, वाशिम जिल्हा युवाध्यक्ष आदित्य काकडे, रिसोड तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण शटाणे, रिसोड शहर युवाध्यक्ष सुनील रांधळ, मेहकर तालुका अध्यक्ष दुर्गादास अंभोरे, मेहकर तालुका सचिव देवानंद अवसरमोल, मेहकर शहर अध्यक्ष महादेव मोरे,मेहकर तालुका अध्यक्ष गणेश वानखेडे आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे समस्त पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते..

