वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा बुलढाणा* *चलो नागपूर... चलो नागपूर.... चलो नागपूर....* महिला मुक्ती परिषदेला, बुलढाणा जिल्ह्यामधून जास्तीत जास्त संख्येने लोकं यावेत म्हणून जिल्हाअध्यक्ष - विशाखाताई सावंग- ह्या रात्रंदिवस महिलांना मार्गदर्शन करत आहेत - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Monday, 18 December 2023

वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा बुलढाणा* *चलो नागपूर... चलो नागपूर.... चलो नागपूर....* महिला मुक्ती परिषदेला, बुलढाणा जिल्ह्यामधून जास्तीत जास्त संख्येने लोकं यावेत म्हणून जिल्हाअध्यक्ष - विशाखाताई सावंग- ह्या रात्रंदिवस महिलांना मार्गदर्शन करत आहेत


 *वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा बुलढाणा* 

*चलो नागपूर... चलो नागपूर.... चलो नागपूर....* 

महिला मुक्ती परिषदेला, बुलढाणा जिल्ह्यामधून जास्तीत जास्त संख्येने लोकं यावेत म्हणून जिल्हाअध्यक्ष - विशाखाताई सावंग- ह्या रात्रंदिवस महिलांना मार्गदर्शन करत आहेत 

       

बुलढाणा - 

वारसा संविधानाच्या शिल्पकाराचा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या परंपरेचा.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 साली मनुस्मृति चे दहन केले होते आणि संपूर्ण भारतीय महिलेला बंधनातून मुक्त करून त्यांच्यावर अनंत उपकार केले आहेत तो दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1942 साली नागपूर येथे *भारतीय महिला मुक्ती दिन* म्हणून साजरा केला होता आणि पुढे ही महिला मुक्ती परिषद चालू ठेवली तोच वारसा पुढे *श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर* यांनी सुद्धा जपलेला आहे 

    या 21 व्या शतकाच्या काळात सुद्धा महिलांवर अनेक अन्याय आणि अत्याचार होत आहेत आणि बाबासाहेबांनी जे दिलेले हक्क आणि अधिकार आहेत ते संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहेत आणि हे संविधानच आता धोक्यात आलेले आहे म्हणून आपले स्वतःचे हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय बहुजनांना पर्याय नाही म्हणून नागपूर येथे होत असलेल्या *महिला मुक्ती परिषदेला* बुलढाणा जिल्ह्यामधून जास्तीत जास्त संख्येने लोकं यावेत म्हणून जिल्हाअध्यक्ष *विशाखाताई सावंग* ह्या रात्रंदिवस फिरत आहेत त्याकरता त्या दिनांक 17 /12/ 2023 रोजी रोहणा, कंझारा, गोंधणापूर, शिरजगाव या ठिकाणी जाऊन महिलांना एकत्रित करून त्यांना मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त प्रमाणात नागपूरला यावे अशी विनंती केली त्या अनुषंगाने त्या सर्वजंणांनी नागपूरला येऊ असे आश्वासन दिले.