तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमेची दोन कंपन्यांकडून विटंबना तथागत ग्रुप आक्रमक
बुलढाणा :- मेहकर येथील उपविभागीय कार्यालय येथे जे.जी ॲड सन्स या कंपनीने व नापतोल या कंपनीने त्यांच्या पॅकेजिंग वर व स्टिमर वर भगवान तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा छापलेली आहे तरी ह्या दोन्ही कंपनी तात्काळ बंद करण्यात याव्या याकरिता तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई, व मा. मुख्यमंत्री तेलंगणा राज्य, मंत्रालय हैद्राबाद यांना निवेदनाद्वारे आशी मागणी केली आहे की तेलंगणा राज्यातील जे.जी ॲड सन्स या कंपनीने त्यांच्या बिडी बंडलच्या पॅकेजिंग वर तसेच आँनलाईन प्रोडक्ट विकल्या जाणारे नापतोल कंपनीने आपल्या दाढी करण्याच्या स्टिमरला (खोर्याला) ह्या दोन्ही कंपनीने भगवान तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा छापलेल्या आहेत यामुळे संपुर्ण बौध्द समाजाची व आंबेडकरी जनतेची भावना दुखावल्या गेली आहे तरी ह्या दोन्ही कंपन्या तात्काळ बंद करुन त्यांच्या मालकांनवर गुन्हे दाखल करावे व आशा विपरीत कार्य करणाऱ्या कंपन्यांवर शासनाने बंदी आनावी याकरिता या ज्या दोन कंपनी आहेत त्या म्हणजे जे जी सन्स तेलंगणा राज्यातील कंपनी व आँनलाईन प्रोडक्ट विक्री करित असणारी नापतोल कंपनी बंद करण्यात यावी आशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र भर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. आसा इशारा प्रशासनाला देण्यात आला..
यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई, गौतम नरवाडे, कुणाल माने, अख्तर कुरेशी, राधेशाम खरात, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे, सुधाकर वानखेडे, देवानंद अवसरमोल, सचिन गवई, सिताराम गवई, नितीन बोरकर आदी तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

