नागपूर येथे स्त्री मुक्तीदिन परिषदेमध्ये बुलढाणा जिल्हाअध्यक्ष विशाखाताई सावंग यांनी ठराव वाचनास अनुमोदन दिले . - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Thursday, 28 December 2023

नागपूर येथे स्त्री मुक्तीदिन परिषदेमध्ये बुलढाणा जिल्हाअध्यक्ष विशाखाताई सावंग यांनी ठराव वाचनास अनुमोदन दिले .


 नागपूर येथे स्त्री मुक्तीदिन परिषदेमध्ये बुलढाणा जिल्हाअध्यक्ष विशाखाताई सावंग यांनी ठराव वाचनास अनुमोदन दिले .

   नागपूर -    स्त्री मुक्ती दिन परिषद वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली  कस्तुरचंद पार्क नागपूर येथेभारतीय स्त्री मुक्ती दिन 25 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर संपूर्ण राज्य कार्यकारणी व जिल्हाअध्यक्ष, जिल्हा महासचिव महिला ह्या उपस्थित होत्या .वंचित बहुजन कार्यकर्ते या परिषदेसाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय परिषदेतील ठराव वाचनाचा बहुमान विशाखा ताई सावंग यांच्या रूपाने आपल्या बुलढाणा जिल्ह्याला  मिळाला. ही आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.भारतात मनुस्मृतीचे कायदे नव्या रूपाने येण्याचे संकेत मिळत आहेत. आपली 85 टक्के जनता गुलामगिरीकडे नेण्याची तयारी सुरू आहे. आपण एक होऊन या विरुद्ध लढा देऊ. 25 डिसेंबर मनुस्मृती दिनाच्या दिवशी स्त्री मुक्ती एल्गार करू. दिनांक 25 डिसेंबर 1927 रोजी महाड या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह परिषद आयोजित केली व बहुजनांविरुद्ध खास तयार केलेल्या वैदिक धर्म व विषमतेची शिकवण देणाऱ्या आणि स्त्रियांना कायम गुलाम करून ठेवणाऱ्या मनुस्मृती या धर्मग्रंथाचे दहन करण्यात आले. त्याच धर्तीवर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 1998 पासून ही मनुस्मृति दहन दिवस हा स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात येत आहे .दरवर्षी हा कार्यक्रम वेगवेगळ्या जिल्ह्यात होत असतो.