जनसंपर्क कार्यालयात राजमाता मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी.! - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Tuesday, 16 January 2024

जनसंपर्क कार्यालयात राजमाता मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी.!


 जनसंपर्क कार्यालयात राजमाता मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी.!


मेहकर : मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांनी मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेची पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व आपल्या छोट्याखानी भाषणातून सांगितले की आदर्श राजमाता कशी असावी याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ होय. राजमाता माँ जिजाऊ यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये तलवारीच्या बळावर दडपशाहीला विरोध करण्याचे धाडस दाखविले. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांकडुन ते स्वप्न पुर्णत्वास देखील नेले. माँ.जिजाऊंनी शिवरायांच्या हद्यात स्वराज्य प्रेम रुजविले. हिंदवी स्वराज्याचे महत्व सांगीतले. राजामाता माँ जिजाऊ यांचे कार्य आणि व्यक्तीमत्व लोकांना प्रेरणा देणारे असे प्रतिपादन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. संदिपभाऊ गवई यांनी केले. दि. १२ जानेवारी २०२४ रोजी जनसंपर्क कार्यालय मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने राजमाता माँ. जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.