तथागत ग्रुप ने केले विविध क्षेत्रातील नामवंतांना सन्मानित..........
तिरस्काराच्या विषारी वातावरणात पुरस्कार बनतो नवसंजीवनी..........
भाई कैलास सुखधाने.....
बुलढाणा मेहकर- दि.27/10/2024
मेहकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका, अशोका हॉलमध्ये आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण, भव्य रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबिर, सरपंच, पत्रकार, विधितज्ञ, उद्योजक, कला, साहित्य, समाजिक, व राजकीय तसेच गुणवंत विध्यार्थी सत्कार असे विविध कार्यक्रमाचे आयोजन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाई कैलास सुखधाने या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आफताबजी खान हे होते.
प्रमुख उपस्थितांमध्ये तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई, रवि मिस्कीन,छोटु गवळी, किशोर गवई,अनिल शर्मा,निसार अन्सारी,वसंता वानखेडे, सिद्धार्थ वानखेडे, भाई दिलीप खरात, अरुणभाऊ डोंगरे, प्रकाश सुखदाणे, युनूस पटेल, गजानन सरकटे, विशाल फितवे, मुख्याध्यापिका सौ. मीनल जोहरे,लक्ष्मी कस्तुरे,प्रतिभा गवई, निता पैठणे,उषा सगट, आम्रपाली गवई,कांचन मोरे उपस्थित होते.
सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध व छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रमुख अतिथींच्या स्वागत, सत्कारानंतर विशाल फितवे यांनी प्रास्तविक सादर केले.
त्यानंतर रक्तदान शिबीर मध्ये मेहकर लोणार येथील 51 रक्तदात्यानी रक्तदान करुन सहकार्य केले,व नेत्र तपासणी ला वयोवृध्द लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला वर्ग 10 वी 12 वी मध्ये प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गोरगरीब, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर मुख्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर भास्कर काळे,आफ्ताबजी खान,भाई कैलास सुखधाने, अनिल शर्मा,किशोर गवई, रवि मिस्किन, संदिप गवई, सिद्धार्थ वानखेडे, गोल्डन मॅन भाई दिलीप खरात, अरुणभाऊ डोंगरे, प्रकाश सुखदाणे, युनूस पटेल, गजानन सरकटे, निसार अन्सारी, छोटु गवळी,विशाल फितवे, यांच्या हस्ते आण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व पुरस्कार कर्त्याना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर सौ मीनल जोहरे यांनी मुलींच्या शिक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. अरुण डोंगरे यांनी यशस्वी मुलांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. सत्काराला उत्तर देतांना डॉ. कृष्णा हावरे यांनी अनेक चित्तथरारक प्रसंग सांगतांना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. आपल्या अनुभवसंपन्न भाषणात भास्कर काळे यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार सर्वांनी मनात रुजवीला पाहिजे. शिकवणी वर्ग नसतांना अनेक मुलींनी मिळविलेले शिक्षण खरंच प्रेरणादायी आहे असे मत मांडले. अध्यक्षीय भाषणात भाई कैलास सुखधाने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत त्यांचा ज्ञानाचा, वाचनाचा विचार रुजविणे काळाची गरज असल्याचे मत मांडले.
या कार्यक्रमाचे बहारदार आणि अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन डॉ. कृष्णा हावरे सर यांनी तर आभारप्रदर्शन युनूस पटेल यांनी केले.
उत्कृष्ट कार्यक्रम केल्याबद्दल सर्व मान्यवरांनी तथागत ग्रुप व संदीपभाऊ गवई यांचे कौतुक केले.

