*निराधार वृद्धाच्या सेवेची दखल घेत मा.वर्ग शिक्षकाची वृद्धाश्रमाला आर्थिक मदत* - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Friday, 26 September 2025

*निराधार वृद्धाच्या सेवेची दखल घेत मा.वर्ग शिक्षकाची वृद्धाश्रमाला आर्थिक मदत*

 



*निराधार वृद्धाच्या सेवेची दखल घेत मा.वर्ग शिक्षकाची वृद्धाश्रमाला आर्थिक मदत*


चिखली -: मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात, भोकर ता चिखली येथे निराधार बेघर घरातून काढून दिलेले नातेवाईक असून त्याचा सांभाळ करण्यास असक्षम आहे अशा वृद्धाची निरंतर सेवा देत असलेल्या माजी विद्यार्थी प्रशांत डोंगरदिवे च्या सेवेची दखल घेत आदर्श विद्यालय चिखलीचे माझे वर्गशिक्षक व आताचे उपप्राचार्य भगवान आरसोडे यांनी आपले  वडील नारायण पुंडलिक आरसोडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ निराधारांच्या सेवे करीता ११,०००-/ (अकरा हजार रुपये) आर्थिक मदत दिली.

आपल्या विद्यार्थी पैकी एक विद्यार्थी निराधार लोकांना निःस्वार्थ पणे सांभाळून त्यांचे सर्व प्रकारे संगोपन करीत आहे. हि बाब माझ्या सारख्या शिक्षकाला अभिमानास्पद आहे. माझे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या हुद्यावर गेले, परंतु प्रशांत डोंगरदिवे हा विद्यार्थी निःस्वार्थ पणे मानवसेवा प्रकल्प द्वारे निराधार वृद्धाची सेवा करीत आहे. अशा विद्यार्थी च्या कार्याची दखल घेऊन मदत करणे हे माझ कर्तव्य आहे, असे मत उपप्राचार्य भगवान नारायण आरसोडे यांनी व्यक्त केले. 

तसेच ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली व्दारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत कायम विनाअनुदानित तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे वयोवृध्द आणि डिपेन्डंट व्यक्तींसाठी  निवासी आश्रम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. येथे गरजवंत निराधार आहेत अशा वयोवृध्द व चालते फिरते भिक्षा मागणारे आजोबा-आजी, डिपेन्डंट व्यक्ती इत्यादींसाठी या तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाची सर्व प्रकरची निःस्वार्थ मोफत सेवा देणे सुरु आहे. येथील वृद्धाच्या सेवे करिता मी ११,०००-/ (अकरा हजार रुपये) आर्थिक मदत केली आहे तसेच चिखली परिसरातील दान दात्यानी मोठया मनाने समोर येऊन अशा होतकरू विद्यार्थीला निराधार वृद्धाच्या सेवे करिता शक्य होईल ती भरीव मदत करून निराधार वृद्धाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन आदर्श विदयालय चिखली चे उपप्राचार्य भगवान नारायण आरसोडे यांनी केले तर कुठेही निराधार बेघर मुलं मुली व इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांचा सांभाळत नसतील अश्या वृद्धानी 8855850378 या नंबर ला संपर्क करावा असे आवाहन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे. 

यावेळी आदर्श विदयालय चे उप प्राचार्य भगवान आरसोडे, शिक्षक प्रकाश एकनाथ तायडे, प्राण वानखडे, प्रबोधनकार गजानन गवई यांची उपस्थिती होती.