रासपा तर्फे प्रा.शिवाजी इंदूरे यांचा सत्कार संपन्न
नांदेड(प्रतिनिधी) :- राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर यांच्या अध्यक्षतेखाली बंदखडके कोचिंग क्लासेस नांदेड येथे घेण्यात आली या बैठकीत नांदेचा प्रतिनिधी म्हणून प्रा.शिवाजी इंदूरे यांची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड केली त्या बदल राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक महादेव जानकर व प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांचे आभार व्यक्त करण्यात आले. व प्रा.शिवाजी इंदूरे यांचा सत्कार शहर कार्यकारिणी तर्फे शहराध्यक्ष राजेंद्रकुमार तुडमे , राजेंद्र बंदखडके, गजानन जामकर , दिंगाबर तुडमे यांनी केले. या बैठकीत गजानन जामकर यांना नांदेड शहर सचिव पदावर निवड करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात गोविंदराम शूरनर म्हणाले येवू घातलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे प्रतिपादन केले. शेवटी गजानन जामकर यांनी सर्वांचे आभार मानले.
