*पोटच्याने जन्मदात्यांना मारझोड करून केले घराबाहेर तर सामाजिक कार्यकर्त्यांनी केले वृद्धाश्रमात दाखल*
*निराधार, बेघर वृद्धाची सेवा हिच खरी मानवसेवा*
भरत जोगदंडे
चिखली -: गत काही दिवसापूर्वी तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे पोटच्या मुलाने स्वतःच्या आई वडिलांचा खून करून स्वतः आत्महत्या केली हि घटना ताजी असतांनाच मेहकर तालुक्यातील एका गावात मन सुन्न करणारी घटना घडली त्या घटनेची पुनःरावृत्ती होऊ नये म्हणून राम धाडे, भरत जोगदंडे, मनोज जाधव यांनी त्या निराधार आई वडिलांना मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे प्रकल्प च्या नियमानुसार दाखल केले.
सविस्तर असे की वडीलाकडे चार एकर जमीन आहे त्यांना दोन मुलं असल्यामुळे दोघांना दोन दोन एकर जमीन वाटून दिले तरीही आर्थिक व घरातील सर्व व्यवहार वडीलाकडेच आहे याचा राग मनामध्ये धरून दारूचे नशेत आई-वडिलांना दररोज मारहाण करणे त्यांनारोज या ना त्या कारणाने शिवीगाळ करणे जेवण न देणे त्यांच घर असून सुद्धा त्यांचे सर्व हक्क अधिकार हिरावून घेतल्यागत त्यांच्यासोबत वागणे हे खूप दिवसापासून सुरू असताना अचानक काही दिवसापूर्वी जोरदार मारहान करून जीवे मारण्याचा प्रयत्न करत असताना आई-वडील घर सोडून पळून गेले म्हणून ते जिवंत राहिले अन्यथा अनुचित प्रकार घडण्यास वेळ लागला नसता त्यामुळे वृद्ध आई-वडिलांनी संबंधित पोलिसात तक्रार दिली परंतु पोलिसांनी वेळेत दखल न घेतल्याने मुलगा जीवाने मारेल या भीतीपोटी ते सैरावैरा भटकंती करत बुलढाणा येथे गेले यावेळी सामाजिक कार्यकर्ते राम धाडे भरत जोगदंडे व मनोज जाधव यांची भेट झाली त्यांनी सर्व हकीकत ऐकल्यावर मन सुन्न झाले म्हणून त्यांनी मानवसेवा प्रकल्प चे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांना सपंर्क करून त्या निराधार बेघर आई वडिलांना तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात दाखल केले.
निराधार, बेघर वृद्धाची सेवा हिच खरी मानवसेवा आहे म्हणून ज्या आई वडिलांनी जन्म देऊन ओळख दिली लहान च मोठ करून स्वतःच्या पायावर उभे केले त्या आई वडिलांचा ज्या मुलांना सांभाळ करण्याची लाज वाटत असेल तर कृपया त्यांना मारझोड न करता कोणताही नाहक त्रास न देता त्यांना मानवसेवा प्रकल्प तुकाराम आश्रय वृद्धाश्रमा च्या 8855850378 या नंबर वर संपर्क करून दाखल करावे असे आवाहन भरत जोगदंडे यांनी केले.
यावेळी राम धाडे, भरत जोगदंडे, मनोज जाधव, ऍड सुनील अवसरमोल, भाई सिद्धार्थ पैठणे, विनोद चव्हाण, विरसेन साळवे व संचालक प्रशांत डोंगरदिवे यांची उपस्थिती होती.
